कारला (देव )येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

144

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद तालुक्यातील कारला देव या गावी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात होलार समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अर्जुनकुमार राठोड होते.
प्रथमता महामानवाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करण्यात आले. होलार समाजा मध्ये बाबासाहेबांच्या विचाराने फार मोठी क्रांती झाली असून शिक्षण आणि नोकरीच्या नवीन संधी तरुणांना खुणावत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी होलर समाजाच्या पुढाकारांनी यावर्षी पुसद तालुक्यात ठिकठिकाणी बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती फक्त नाचून साजरी न करता महामानवांचे विचार अंगीकारून भविष्याची वाटचाल कशी करता येईल यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी उपस्थित असलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखाध्यक्ष अजय टाळीकोटे यांनी केले तर आभार गोविंदा टाळीकोटे यांनी मानले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, डॉक्टर अर्जुनकुमार राठोड, अरुण पुलाते उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास देवकते उपसरपंच कारला, माणिक करे, काशीराम टाळीकोटे,गणेश टाळीकोटे, रामभाऊ हीरंगने, नारायण हीरंगणे, किसन ताळीकोटे, बबन टाळीकोटे, संजय भंडगीर, सुधाकर टाळीकोटे, बाबुराव वाहुळे, आशाबाई टाळीकोटे, गंगाबाई देवकते, शितलबाई टाळीकोटे , पुनम देवकते, चंद्रकला टाळीकोटे,आदींनी परिश्रम घेतले.