मा संजय देशमुख यांना भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांचा जाहीर पाठिंबा

87

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद:लोकसभा उमेदवार, वाशीम-यवतमाळ मतदार संघामधून संजय देशमुख यांना भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांचा कार्यकर्त्यासह पाठिंबा जाहीर केला.
भारतातील लोकशाही व संविधान वाचविण्याच्या हेतुने तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय नेते अॅङ भाई चंद्रशेखर आझाद यांचे सुध्दा उद्देश लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, यांच्या विचारांच्या परंपरेतील उमेदवार म्हणून आपण हे बहुजना दलित, आदिवासी, इतर मागासर्वाय, अल्पसंख्यांक व महिला इत्यादि समाजाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे भारत एकता मिशन भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष यांनी संजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा देऊन संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेले आहे असे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी कळविले आहे.