सम्यक बुद्ध विहार येथे महान राजे सम्राट अशोक यांची जयंती संपन्न

303

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 17 एप्रिल) शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे महानराजे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती रमामाता महिला मंडळ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्म जिवंत ठेवणारे, प्रचारक,प्रसारक चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना उपस्थितांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते.
सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे.

प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले.
अशाच महान सम्राटांना दिली जाते.

सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात.
चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’ जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे.

असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले.

पण कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. 84 हजार बौद्ध स्तूप बांधून एक नवा इतिहास निर्माण केला होता.

तसेच सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता.
असे मार्गदर्शन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी यावेळी केले.

तसेच भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये डान्स स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धेतील स्पर्धकांना तसेच शहरातील चौकांमध्ये नृत्याचे सादरीकरण करणाऱ्यांना एक पेन एक वही असे बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आले.

तसेच रमामाता महिला मंडळाचे अध्यक्ष उषाताई संतोष इंगोले यांच्यातर्फे माता रमाईचा फोटो फ्रेम सम्यक बुद्ध विहाराला भेट दिला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उषाताई इंगोले, भारतीताई केंद्रेकर, कांचन दिवेकर, उज्वला धबाले, मधुबाला दिवेकर, विद्या इंगोले, सुनीता दिवेकर, बेबाबाई गवंदे, राखी धबाले, स्वाती दिवेकर, प्रज्ञा दिवेकर, रंजनाबाई आठवले, भारताबाई दिवेकर, मीराबाई दिवेकर, ज्योती हटकर, ममता श्रवले, ज्योती श्रवले, मायाबाई पाईकराव, लता श्रवले, ज्योती पाईकराव, कविता श्रवले, शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, सुभद्राबाई पाईकराव, संतोष इंगोले, तुषार पाईकराव इत्यादींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे आयोजन रमामाता महिला मंडळ तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी अनेक उपसिका सर्व मंडळी आणि बालक, बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.