अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक

  476

   

  ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी

  चिमूरः-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात सहा वऱ्हाडी जखमी झाले. वाहन रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला रोड वर पलटी झाला असून हि घटना दि.२५/०४/२०२४ ला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त शिरपूर येथील गोवारी समाजाच्या परिवारातील शेंदरे यांच्या मुलाचे तर पळसगाव येथील सुधाकर वघारे यांच्या मुलीचा विवाह सोहळा पळसगाव येथे मुलीच्या राहत्या घरी संपन्न झाला.
  पळसगाव येथे लग्नानंतर वऱ्हाडी मंडळी नवरदेवाच्या शिरपूर या गावाकडे पळसगाव येथून परत जात असताना गोंडमोहळी फाटका जवळ उतार मार्गावर भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकाने ब्रेक दाबल्याने महिंद्रा कंपनीचा मॅक्सीमो मालवाहक ऑटो पलटी होऊन हि घटना घडली आहे. ऑटो क्रमांक एमएच ३४ बीजे १९८४ या आयशर गाडीने ते प्रवास करत होते. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये १. अक्षय भानारकर वय ३० वर्ष राहणार शिरपूर, सोनबा वगारे वय ६५ वर्षे शिरपुर, लता नेवारे वय ३२ वर्षे शिरकाळा, प्रणय आडे वय १७ वर्षे शिरपूर, सलोनी लोहट वय ७ वर्षे ओवाळा (नागभीड), गीता लोहट वय २५ वर्षे ओवाळा (नागभीड), अशोक शेंद्रे शिरपुर वय ३० वर्षे निखिल लोहट वय ९ वर्षे मंगला नेवारे वय १३ वर्षे मांगली सिंदेवाही कांता नेवारे वय ४० वर्षे मांगली. अशी जखमींची नावे आहेत. वाहनाचा अपघात होताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथमोपचारासाठी नेण्यात आले.

  डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. जखमींपैकी सोनबा वघारे शिरपूर हे गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. अपघात स्थळी परीसरातील नागरिकांनी गर्दी केली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.