इरई नदीवरील सिमेंटच्या बंधाऱ्याला मातीचा वापर.. – प्रहार सेवक विनोद उमरे यांची ठेकेदारावर कारवाईची मागणी

180

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी

सावरी येथिल इरई नदीवर सिमेंटचा बंधारा बांधण्यात आला.सन २०२१-२२ मध्ये बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. परतु पहील्या पावसाळ्यात सिमेंटचा बंधारा तुटून गेल्याचे गावकऱ्यांच्या विनोद उमरे यांच्या निदर्शनास आले. नंतर विनोद उमरे यांनी बंधाऱ्याचे बांधकाम करणयाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विनोद उमरे यांनी केली होती. तसेच अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा बंधाराऱ्याच्या पिचींग भरण्याचे सन २०२४ मध्ये बधाराऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून ते बांधकाम मातीचे आहे . इतिहासात पहिल्याच असे काम आहे की नदीवर बंधारा बांधण्यासाठी माती वापरत आहे. .इरई नदीवरील मोठे महापूर येतात व नदीला लहान मोठ्या नदी,नाल्यांचे सुध्दा पाणी येतात त्यामुळे पाण्याची मोठी आवक असते.तशात जर नदीवर जर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले असेल त्यात पिचींग मध्यें माती जर वापरत असेल तर ही इतिहासिक बाब आहे.करण पाण्याची मोठी आवक असता नदीवरील मातीचे बांधकाम कसे काय?टिकेल असा प्रश्न विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे. इरई नदीवरील बंधाराऱ्याचे बांधकाम जर निकृष्ट दर्जाचे झाले असून प्रहार सेवक विनोद उमरे यांनी उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग चिमूर याना या संदर्भात निवेदन दिल आहे. जर भष्टाचार कराल तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा सुध्दा दिला.