उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी उज्वला गाडे

101

*सचिन सरतापे प्रतिनिधी म्हसवड मोबा.9075686100*

 

म्हसवड : माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मतदान प्रक्रिया उद्या मंगळवार दि. ०७ मे २०२४ रोजी पार पडत असून यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिली.
मान मतदारसंघात ०३ लाख ५० हजार अकरा एवढे मतदार असून यामध्ये पुरुषांची संख्या एक लाख ८० हजार २७ एवढे आहे, तर महिला मतदार ०१ लाख ६९ हजार ९७५ एवढी आहे तर इतर मतदारांची संख्या ०९ एवढी आहे. ३६९ मतदान केंद्रावर उद्या मतदान होणार असून तीन आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रशासनाने तीन वेगवेवेळ्या संकल्पना राबवल्या आहेत. यामध्ये जय जवान ही संकल्पना म्हसवड मतदान केंद्रावर, जय किसान तडवळे मतदान केंद्रावर तर हुतात्मा ही संकल्पना वडूज मतदान केंद्रावर राबवून तिन्ही मतदान केंद्रांची आदर्श मतदान केंद्रे म्हणून निर्मिती करण्यात आली असल्याची माहितीही सौ. गाडेकर यांनी दिली.
पत्रकारांना माहिती देताना त्या म्हणाल्या की,मतदानासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आवश्यक असलेल्या सेवा सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. वाढते तापमान विचारात घेऊन मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडप जिथे आवश्यक आहे तेथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिला मतदार व जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याचे प्रतीक्षा कक्ष, ओआरएसचे पाकीट यांसह फिरते वैद्यकीय पथकही पाचारण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली