बौद्ध तरुणाला घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण करून डोक्यावर केले मूत्रविसर्जन (नऊ आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल)

  998

   

  ✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

  उमरखेड (दि. 7 मे ) तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील बौद्ध तरुणाला घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण करून त्याच्या डोक्यावर मूत्रविसर्जन करण्याची घटना घडली आहे.

  अर्जदार पवन दिलीप वाठोरे वय 24 वर्ष राहणार ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून खालील प्रमाणे गैर अर्जदार ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तसेच विविध कलमेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
  सविस्तर वृत्त असे की,
  ज्ञानेश्वर निमलवाड अं. वय 23 वर्ष जात मुनरवार दोन्ही रा. ढाणकी हे माझ्या घरात दरवाज्याला लाथ मारुन घुसले. व पवन कोठे आहे त्याला मारायचे आहे. त्याने आमचे अत्याच्या मुलीला का बघतो असे म्हणुन मला घरात शोधु लागले तेव्हा मी घरातून घाबरुन पाठीमागच्या दरवाज्याने पळुन गावात गेल्यावर माझ्या आईला त्यांनी धापड- बुक्यानी मारहान केली.

  व माझा गावात शोध घेत होते नंतर काही वेळाने मी त्यांना गावात छत्रपती शिवाजी चौका जवळ चालु असलेल्या घराचे बांधकामा जवळ आडोसा घेवुन लपुन बसलेला दिसलो तेव्हा त्याचे सोबत 3) भैया अशोक घोगरकर अं. वय 19 वर्ष जात लोहार 4) विशाल धबडगे अं. वय 28 वर्ष जात मराठा 5) बंटी धबडगे अं.वय 21 वर्ष जात मराठा 6) बादल पुर्ण नाव माहित नाही. अं. वय 23 वर्ष जात माहित नाही. 7) अर्जुन सुगमरवाड अं. वय 22 वर्ष जात मुनरवार 8) रघु दिगांबर कर्नेवाड अं. वय 40 वर्ष जात मुनरवार 9) परमानंद आडवे अ. वय 32 वर्ष जात मुनरवार सर्व रा. ब्राम्हणगाव यांनी येवुन मला पकडुन गैरअर्जदार क्र. 3 व 6 यांनी मला दोन्ही हात व पाय पकडुन रस्त्यावर आणून ढकलुन दिले. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 व 9 यांनी लोखंडी रॉडने पाठीवर, पायावर मारहान केली, गैरअर्जदार क्र.2 यांनी आडजात लाकडांनी दोन्ही हातावर मारहान केली. गैरअर्जदार क्र. 4, 5, 7 व 8 यांनी लाथा बुक्यानी मला जमीनीवर पाडुन मारहान केली. त्यादरम्यान माझे जवळील व्हिओ कंम्पनीचा Y- 22 मोबाईल किंमती 17,000/-रुपये व नगदी 10,000/- रुपये खिस्यातुन पडले ते त्यांनीच घेतले असावे. त्यानंतर त्यांनी मला मोटार सायकल वर उचलुन बसवुन चला याला पोलीस स्टेशनला नेवुन फेकून देवु असे म्हणून मला तेथुन घेवुन रस्त्याने येत असतांनी हरदडा फाट्याजवळ गाडी थांबवून मला गाडीवरुन ढकलुन देवून गैरअर्जेदार क्र.1 व 9 यांने माझ्या डोक्यावर लघवी करून जातीवाचक शिवीगाळ केली.
  व मला परत गाडीवर बसवुन स्वामी विवेकानंद शाळे जवळ असलेल्या गौशाळेच्या बोर्डाजवळ गाडीवरुन उतस्युन मला पुन्हा लाथा-बुक्यानी मारहान करुन याला खतम करुन टाकु असी जिवाने मारण्याची धमकी दिली व पुन्हा मला मोटार सायकल वर बसवुन गैरअर्जदार क्र.2 यानी ताण्यासमोर आणून लाथा मारुन मला पोलीस स्टेशनला आणुन बसविले पोलीसांनी माझे सरकारी दवाखाण्यातुन वैद्यकिय तपासणी करुन आणली. तेव्हा मला पप्पु निमलवाड यांने तु रिपोर्ट दे तुला बाहेर आल्यावर खतमच करतो असी धमकी दिल्याने मी रिपोर्ट दिला नाही व पोलीसांन सोबत माझ्या घरी गेलो, आज रोजी माझ्या तब्यतीत सुधार झाल्याने पोलीस स्टेशनला येवुन गैरअर्जदार यांचे विरुध्द योग्य तो कार्यवाही करीता तक्रार देत आहे. माझा जबानी रिपोर्ट माझ्या सांगनेप्रमाणे संगणकावर टाईप केला मी वाचून पाहिला माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे.
  अशी तक्रार पवन दिलीप वाठोरे यांनी दिली आहे.

  गैरअर्जदार 1) पप्पु निमलवाड (रा.ढाणकी)
  2) ज्ञानेश्वर निलमवाड (ढाणकी)
  3) भैया अशोक घोगरकर (रा. ब्राह्मणगाव)
  4) विशाल धबडगे (रा. ब्राह्मणगाव)
  5) बंटी धबडगे (रा. ब्राह्मणगाव)
  6 बादल (रा. ब्राह्मणगाव)
  7) अर्जुन सुगमवाड,(रा. ब्राह्मणगाव)
  8) रघु दिगांबर करणेवाड (रा. ब्राह्मणगाव)
  9) परमानंद आडबे (रा. ब्राह्मणगाव) तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार
  कलम141,143,147,323,324,506,149,452
  अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989
  3(1)(r), 3(1)(s),
  3(2)(va) इत्यादी कलमानुसार उमरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
  पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके हे करीत आहेत.