खटाव मध्ये डेंग्यू चे रुग्ण

  123

   

  सातारा ,खटाव प्रतिनिधी
  नितीन राजे 9822800812

  खटाव मध्ये ऐन उन्हाळ्यात डेंगूसदृश्य रुग्ण आढळले असून आरोग्य विभाग कुठे आहे समजायला तयार नाही.
  सर्व साधारणपणे पावसाळ्यामध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या जास्त असते .मात्र उन्हाळ्यातील खटाव मधील तापमान जवळजवळ 38 पर्यंत गाठले असताना खटाव मध्ये डेंगू चा ताप देखील चढलेला दिसून येत आहे रुग्णांची संख्या वाढ होत असून ग आरोग्य विभागाने तात्काळ दक्षता घेण्याची गरज आहे.
  *आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर*
  यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर युनूस शेख यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात माहिती दिली असता त्यांनी ताबडतोब यावर रुग्णांची माहिती घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागात दिले आहेत.