वयोवृद्ध आणि अपंगानी बजावला मताधिकार!

85

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : माढा लोकसभा निवडणुकीसाठी म्हसवड येथील ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात मतदानाचा अधिकार बजावला. सकाळी लवकर उठून रांगेत जाऊन मतदान करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांची संख्या मोठी होती. शहरी व ग्रामीण भागातूनही ज्येष्ठांचा उत्साह वाखणण्याजोगा होता यावेळी सर्वच मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक सूर्य आग ओकत असताना सुद्धा आनी प्रकृतीची तमा न बाळगता आपल्या कुटूंबातील सदस्यांना घेऊन हे नागरिक मतदानाला आले होते हे विशेष .

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळी लवकर मतदानाला बाहेर पडावे किंवा ऊन खाली झाल्यावर मतदानासाठी यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठांना करण्यात आले होते. या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक याच्यात याविषयी जनजागृती करण्यात आली होती त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला .
*लोकशाहिच्या या उत्सवात वयोवृद्ध आणी अपंग मतदारांनी जो मतदाणासाठी उत्साह दाखविला तो वाखाणण्या जोगा आहे या मतदारांना मतदान केंद्रावर नेताना आनी त्यांची सेवा करताना एक प्रकारे विशिष्ट आनंद मिळाला*
*गणेश म्हेत्रे, नगरपालिका कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ता, म्हसवड*