खानापूर विधानसभा मतदारसंघात निचांकी मतदान

116

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : सांगली लोकसभा निवडणूक २०२४ च्या साठी काल मतदान पार पडले.यामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघात एकूण त्यापैकी फक्त ५२%मतदान झाले.ते अन्य मतदारसंघाच्या तुलनेत एकदम निचांकी म्हणून नोंद झाली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी पुढीलप्रमाणे. मिरज – 59%
सांगली – 57% पलूस-कडेगाव – 56% खानापूर – 51% तासगाव-कवठेमहांकाळ 61% व
जत- 59%
टक्के इतके अंदाजित मतदान झाले. याचा अर्थ खानापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार असूनही तो मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी यशस्वी झाला नाही.इतर मतदारसंघात चुरस व चढाओढीने मतदानप्रक्रिया विधानसभा व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे झाली.या लोकसभा निवडणुकीकडे काही तालुक्यातील नेत्यांनी सहा महिन्यांत होणाऱ्या भावी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्याने ही ईर्षा दिसून आली.कारण या निवडणुकीत अनेक दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षाचे,नेत्यांचे व युती,आघाडीचे आदेश झुगारून मुक्तपणे काम केले. त्यामुळे त्यांचेही राजकीय शिक्षण,गटबांधणी व स्वतःची क्षमता तपासण्याची संधी प्राप्त झाली होती.प्रस्तुत प्रतिनिधींच्या निरिक्षणात तर असे आले की वरिष्ठ पातळीवरून कोणताही दबाव नसल्याने काही कार्यकर्ते तर स्वतः नियोजन करून व आपल्याला तंत्राने प्रचारयंत्रणा राबवत होते.याचे काही ठिकाणी यश प्राप्त झाल्याचे दिसून आले.त्यामुळे याचा दृश्य परिणाम येत्या सर्व निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.कारण दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांना या निवडणुकीत आम्ही काही ऐकणार नाही, विधानसभा निवडणुकीत आपण सोबत असू असे सुनावल्याने नेत्यांपुढे धर्मसंकट उभे राहिले आहे.कारण तालुक्यात व मतदारसंघात जर आपणास कमी मताधिक्य मिळाले तर पक्ष व उमेदवारांना काय उत्तर देणार? त्यामुळे पुढील निवडणुकीत उमेदवारी मिळवताना अडचणी निर्माण होणार? अशा चिंतेत अनेक नेते दिसले.सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सहा मुख्य पक्ष तर वंचित, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार,रासप,बसपा असे एकूण दहा पक्षांचा पर्याय उपलब्ध असल्याने अनेक राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या नवनवीन कार्यकर्त्यांच्या इच्छेला धुमारे फुटले आहेत.सध्या राजकारणात बिल्डर, वाळू तस्कर,मटका बुकी, हातभट्टीवाले, ठेकेदार, उद्योजक, बागायतदार, कमीशन एजंट,व्यावसायिक, गुन्हेगार, घराणेशाहीतील व दोन नंबरवाले मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.त्यामुळे सुशिक्षित, वैचारिक, सामाजिक चळवळीत कार्यरत, स्वच्छ चारित्र्याचे, निष्ठावंत, तत्वनिष्ठ व नितीमत्ता जपणाऱ्या मंडळींची कमतरता आहे.जर असे तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी झाले तर लोकशाही आणखी समृद्ध व संपन्न होईल.निवडणूक हा राजकारणाचा खूप छोटा घटक आहे.त्यामुळे अगोदर राजकारण समजून घेणे आवश्यक आहे.