धरणगाव शहरातील जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात संपन्न !…. महाजन कुटुंबीयांच्या वतीने धरणगाव शहरात सत्यशोधक विवाह सोहळ्याचा षटकार !..

  112

   

   

  धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

  धरणगांव – धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भादु महाजन व लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन यांचा चिरंजीव सत्यशोधक भूषण व नशिराबाद येथील सुरेश नथ्थु महाजन यांची सुकन्या निकिता याचा सत्यशोधक विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सत्यशोधक विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्री गुलाबरावजी पाटील, अनिल भाईदास पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी विधान परिषद आमदार मनीष जैन, उ.बा.ठा.चे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर व शहरातील सर्व समाजाचे अध्यक्ष व पंचमंडळ तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, पर्यावरण, क्रिडा, साहित्यीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
  खंडेरायाची तळी भरून सत्यशोधक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना सामूहिक रीतीने घेण्यात आली. सत्यशोधक विवाह स्थळी क्रांतीची मशाल वधू-वरांच्या शुभहस्ते पेटविण्यात आली यानंतर वर माता-पिता व वधू माता – पिता यांच्या शुभहस्ते महात्मा बळीराजा, संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यागमुर्ती रमाई व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
  राष्ट्रपिता जोतिराव फुले लिखित मंगलाष्टक झाल्यानंतर वधू-वरांनी सामूहिक सार्वजनिक सत्यधर्म प्रतिज्ञेची शपथ घेतली. या सत्यशोधक विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या मान्यवरांना आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या ८०० प्रतिमा भेट देण्यात आल्या. यानंतर उपस्थित सर्व माता-भगिनींना पी डी पाटील सर लिखित “आदर्श महामाता ” हे २०० ग्रंथ भेट देण्यात आले.
  माहीती अधिकार चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, सौ.पुष्पा व ज्ञानेश्वर महाजन, लक्ष्मणराव पाटील यांच्या हस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे ( चाळीसगाव ) यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने सर्व विधी करण्यात आले. वर पिता ज्ञानेश्वर भादू महाजन यांच्याकडून सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य यांना ५००१ रुपये सहयोग निधी देण्यात आला .या सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रस्ताविक – सूत्रसंचलन पी डी पाटील, गोपाल बाविस्कर, व्ही.टी.माळी व आभार सौ. पुष्पा व ज्ञानेश्वर महाजन यांनी मानले.