संतोष कोळी यांची परिवर्तनवादी पत्रकार संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष पदी निवड

32

✒️नवनीत बागले(दिंडाईचा,प्रतिनिधी)

मो:-8975147176

दोंडाईचा(दि.7ऑगस्ट):-बेरोजगार भूमिहीन मजदूर व असंघटित कामगार संघ संचलित पुणे येथील परिवर्तनवादी पत्रकार संघाच्या दोंडाईचा येथील अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज जिल्हा अध्यक्ष दिल्ली शाखा महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष कोळी यांची परिवर्तनवादी पत्रकार संघाची धुळे जिल्हा अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष संजय जी रणदिवे साहेब,(पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून संतोष कोळी पत्रकार यांची निवड करण्यात आली आहे.

     निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहेत्यांच्या निवडीबद्दल बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष नवनीत बागले, जिल्हा सरचिटणीस ओंकार पगारे, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील , एडवोकेट संतोष भोई, एडवोकेट बबलू रॉय, समाज सेवक दिपक गायकवाड (भाऊसाहेब), पत्रकार संजय कुवर ,पंकज खंडारे, भोला भाऊ इत्यादींनी निवडीबद्दल कौतुक केले आहे .