मातंग समाज व तत्सम पोट जातीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा

    45

    🔸साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):-सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम पुढिल पोट जात मांग, मातंग, मिनिमादीग, मादींग, दानखनीमांग, मांगमहाशी, मदारी, राधे मांग, मांगगारूडी, मांग गारोडी, मादगी, मादीगा या जातीतील विद्यार्थी विद्यार्थीनींना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधिन राहुन साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. दि. 10 ऑगस्टच्या आत सर्व कागदपत्रानिशी अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    जातीचा दाखला, फोटो, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, राशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इ. कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, आरटीओ ऑफिसच्या बाजुला, चंद्रपूर कार्यालयात संपर्क साधावा.