🔸समाज कल्याण विभागाचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):-केंद्र शासनाच्या, विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन 2020 करीता विविध प्रकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांचेकडून अर्ज मागविलेले आहेत. या अर्जामधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी केले आहे.

सन 2020 च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांनी दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत विहीत नमुन्यात तीन प्रतित प्रस्ताव सादर करावा. विहीत अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या, विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED