एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कार्यालय येथे जागतिक आदिवासी दिन

    52

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.9ऑगस्ट):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी आदिवासी नेत्यांच्या प्रतिमांना हार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी वृंदानी पुष्पार्पण करुन महान नेत्यांना अभिवादन केले.

    कार्यक्रमाच्या प्रसंगी इतर कर्मचारी यांनी आदिवासी दिनावर प्रकाश टाकला व पुढे विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना तिमिरातून तेजाकडे नेण्याची कटीबध्दता व्यक्त केली. कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.मडकाम यांनी सर्वाचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.