कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दि.12 ऑगस्ट पासून बीड, परळी, अंबाजोगाई ,आष्टीसह ,केजमध्ये दहा दिवसाची संचारबंदी

31

✒️आतुल बडे(परळी/बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी/बीड(दि.9ऑगस्ट):- जिल्हात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊले उचललेआ आहेत. गेवराईनंतर बीड शहरात अँटिजेन टेस्ट केल्यानंतर काल तब्बल 86 तर आज दुपरर्यंत तब्बल 62 पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हात कोरोनाचा मोठा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दि. 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान बीड. परळी. अंबाजोगाई . आष्टीसह . केजम 10 दिवसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बंद काळामध्ये अत्यवश्यक सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बीड जिल्हामध्ये गेल्या दहा 12 दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हातील बीड. परळी. अंबाजोगाई आष्टीसह . केजमध्ये 10. दिवसाची संचारबंदी लागून करण्यात आली आहे. ही संचारबंदी दि 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान असेल . व या दरम्यान सदरील शहरे बंद राहाणार आहेत .

यामध्ये दूध विक्री घरपोहच सकाळी 7 वाजल्यापासून .ते 9 पर्यंत सुरु राहणार आहे. खाजगी व शासकीय रुग्णालय केवळ रुग्णांलयाशी सलग्ण औषधे दुकाने सुरु राहतील (सर्वांनी त्यांना जे औषधे गोळ्या लागतील त्या दि . 11 ऑगस्ट 2020 पर्यंत खरेदी कराव्यात.) संचारबंदीच्या काळात प्रासारमाध्यमे सुरु राहणार असून घरगुत्ती गॉस सेवा संबधीत एजन्सी धारकांनी आपले एजन्सीचा गणवेश परीधान करावा व ओळखपत्र बाळगावे . यासह इतर नियम लागू करण्यात आले आहेत.