चंद्रपूर मनपाच्या दुर्लक्षा मूळे डेंगु रुग्ण अाढळला

    39

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपुर(दि.11ऑगस्ट):-मनपाच्या दुर्लक्षा मुळेच बाबुपेठ परिसरातील दर्यानगर येथे अाज दि. 11अाॅगस्ट 2020ला डेंगु रुग्ण अाढळला अाहे. मनपाने त्वरित खबरदारी घेऊ परिस्थिती नियत्रंनात अाणावी अशी मागनी अाप माहानगर यांनी अायुक्ताला निवेदना द्वारे केली अाहे. अाम अादमी पार्टी माहानगर ने दि. 6 जुलै 2020 ला झोन कार्यलय 3 मध्ये निवेदन देऊन दर्यानगर परिसरात नाली बांधकाम करुन सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागनी केली. मात्र अाप च्या निवेदना कडे दुर्लक्ष केल्याने पावसळ्यात या परिसरात घानीचे साम्राज्य पसरले. मछराचा प्रादृभाव वाढला यामुळे डेंगुचा रुग्ण अाढळला. या परिस्थितीची दखल घेत अाज दि. 11 अाॅगस्टला अाप ने मनपा अायुक्ताची भेट घेऊन मनपा सपुर्ण परिस्थितीशी अवगत केले. यावेळे. अाप माहानगर उपाध्यक्ष योगेश अापटे, सुनिल भोयर, सहसचिव अजय डूकरे, कोषाध्यक्ष सिकंदर सागोरे, सोशल मीडीया राजेश चेडगुलवार, कामगार नेते संदिप पिंपळकर अादिंची उपस्थिती होती.