नांदेड जिल्ह्यात आँनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र तिस हजार दिव्यांग असताना दिव्यांग मिञ अँपमधे फक्त एक हजार दिव्यांगाची नोंद – चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

42

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.11ऑगस्ट):-जिल्हयातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘ दिव्यांग मित्र नांदेड ‘ हे अॅप तयार करण्यात आले असून सदरील अॅप आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर मधून डाऊनलोड ,करून त्यातील माहिती अचूक भरावी म्हणून त्या अँपचे प्रशिक्षण सर्व गटविकास अधिकारी यांना देऊन प्रत्येक गावात ग्रामसेवक व ग्रामपंचायत आँफरेटर यांना आदेश देऊन सुद्धा त्यांची प्रभावी अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात न झाल्याने फक्त एक हजार दिव्यांग बांधवांनी नोंद केली नांदेड जिल्ह्यातील तिस हजार दिव्यांग बांधव या नोंदणी पासुन वंचित राहात आहेत.
नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग मिञ अँपमध्ये नोंद करण्यात आलेली आकडेवारी शेकड्याने खालील प्रमाणे
1) माहुर 189 2) मुदखेड 207 3) कंधार 271 4) भोकर 300 5) धर्माबाद323 6) हिमायतनगर 384 7) ऊमरी 415 8) अर्धापुर 419 9) लोहा 503 10) नायगाव 523 11) हदगाव 622 12)नांदेड 672 13) बदलली 707 14) किनवट 741 15) देगलूर 848 16) मुखेड 1317
एकून सोळा तालुक्यात दिव्यांग मिञ अँप मध्ये जी प नांदेड अंतर्गत ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग मिञ अँपमध्ये ऐकुन तिस हजार दिव्यांग 21 प्रकारचे असताना प्रशासन यांच्या कामचुकार मुळे फक्त 8350 नगरपालिका कक्षात 1700 असे ऐकुन दहा हजार दिव्यांगाची नोंद करण्यात आली तेहि चळवळ संघटनेने सोशल मिडिया वर केल्यामुळे झाली.
सदरील दिव्यांग अॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आपली नोंदणी नऊ फोल्डर सविस्तर व्हावी म्हणून त्यांची प्रभावी अंमल
बजावणी व्हावी म्हणुन दि 14 जुलै ते 31 जुलै पर्यंत नोंदणी करण्यासाठी दिव्यांग संघटना. सामाजिक कार्यकर्ते यांना विचारात घेऊन नोंदणी करावी असे आदेशीत करून सुध्दा कोणत्याही गटविकास अधिकारी यानी विचारात न घेता लवकर आदेश न दिल्याने ग्रामपंचायत आँफरेटर, हे विमा भरण्यात गुंग असल्याने व ग्रामसेवक प्राणी भेटत नसल्याने हे लक्षात घेऊन अनेक संघटनेनी सोशल मिडिया वर माहिती दिल्यामुळे कांही प्रमाणात दिव्यांग बांधव वनवन भडकून सेतु केंद्र मिञाकडे नोंदणी केली आहे़
पण अनेक दिव्यांग बांधव वंचित राहात असल्याचे खंत डाकोरे पाटिल यांनी व्यक्त केली.
प्रशासकीय अधिकारी वरिष्ठाच्या आदेशाची अंमल बजावणी करीत नसल्याने अनेक योजना दिव्यांग बांधवाना मिळत नसल्याची खंत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर. माधव शिंदे. ज्ञानेश्वर नवले. राजु शेरकुरवार शंकर शिंदे. विठल बेलकर यादव फुलारी बालाजी ताटे, मोहन कऊटकर सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर, पांडुरोग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर, यांनी प्रसिद्ध केले आहे.