बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी लागणारे ई-पास रद्द करून सामान्य नागरिकांना होणारी गैरसोय दूर करा

27

🔸शिवसेना नेते सुभाष घुटे यांची मागणी

✒️अहेरी (पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी (दि. १३ ऑगस्ट) : बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी लागणारे ई-पास रद्द करून सामान्य नागरिकांना होणारी गैरसोय दूर करा अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना नेते सुभाष घुटे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.

सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील ई- पास तात्काळ रद्द करावी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोणा चे आगमन झाले तेव्हा पासून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे फक्त एकाचा मृत्यू झाला आहे परंतु मलेरियामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तसेच इतर आजारामुळे त्यांना वैद्यकीय सेवा वेळेवर न मिळाल्यामुळे २५ ते २६ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आपण प्राप्त करून घ्यावी जेणेकरून आपल्याला माहीत होईल असे निवेदनात नमूद आहे.

अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे असलेल्या रक्तपेढी विभागातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणी वर्धित करून उपजिल्हा रुग्णालय मध्ये रूपांतर केले तेव्हा रक्तपेढी विभागातील सर्व पद नष्ट केलेली आहे उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे ब्लड बँक असून सदर रुग्णालयांमधून अहेरी एटापल्ली भामरागड व सिरोंचा या चारही तालुक्यात रक्त पुरविले जातात तसेच हे चारही तालुके नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागात असून कधीही रक्ताची आवश्यकता पडु शकते व उपजिल्हा रुग्णालय सोडून इतर ठिकाणी रक्‍ताची व्यवस्था कमीत कमी १५० किमी अंतरा शिवाय होत नाही उपजिल्हा रुग्णालय अहिरे येथे कर्मचारीसुद्धा नाहीत. त्यामुळे रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूर या ठिकाणी पाठविण्यात येते. परंतु ई- पास घेण्याकरता बराच वेळ निघून जातो. त्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार घेण्यासाठी चंद्रपूर किंवा नागपूर जाऊ शकत नाही तसेच शेतकऱ्यांना शेतीचे काम करत असताना काही वाहनाचे बिघाड झाल्यास सामान आलापल्ली आणि गडचिरोली जिल्ह्यात मिळत नाही त्यांना चंद्रपूर नागपूरहून आणावे लागते. त्याकरिता पास काढत असताना पास वाले वेगवेगळी कारणे देऊन पास रद्द करतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असे निवेदनात नमूद आहे.

—————————————————————————-

ई-पास रद्द करण्याच्या संदर्भात आंदोलन करण्याचे दृष्टीने सामाजिक कार्यकर्ता सुभाष शामराव घुटे मोबाईल नंबर 9511782720 अल्लापल्ली यांचेशी संपर्क साधावा.