आदर्श विचाराला कृतीची जोड दिल्यास जीवन सार्थकी लागेल – प्रा. दिवाकर गमे

27

🔸श्री.साईबाबा महाविद्यालयात 74 वा स्वातंत्र्यदिन व सत्कार-सन्मान समारंभ

✒️सचिन महाजन(वर्धा, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9765486350

वर्धा(दि.15ऑगस्ट):-हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील श्री.साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन व 74 वा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, महात्मा फुले समता परिषदेचे पूर्व विदर्भ संघटक आणि महाविद्यालयाचे संस्थापक सचिव प्रा.दिवाकर गमे यांची नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अर्थात महाज्योतीच्या अशासकीय संचालकपदी नियुक्ती झाल्याबाबत स्टाफ क्लबच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार-सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उत्तम पारेकर, संस्था-सहसचिव अविनाश गमे, स्टाफ क्लब-अध्यक्ष प्रा. डॉ. नरेश भोयर, डॉ.प्रसाद गमे, स्टाफ क्लब – सचिव प्रा.विनोद मुडे यांच्या उपस्थितीत पार पडला. शेतकरी-शेतमजुर, विद्यार्थी, महिला, ओबीसी, दलित, शोषित आणि वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने अहोरात्र संघर्ष करून यशस्वी न्याय मिळवून देणारे समाजसेवक प्रा.दिवाकर गमे साहेबांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने महाज्योतीच्या संचालकपदी केलेली निवड ही त्याच्या कार्याची पावती आहेत. आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, असे विचार प्राचार्य डॉ.उत्तम पारेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सत्कारप्रसंगी प्रा. दिवाकर गमे म्हणाले की, समाजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की त्यामुळे आपल्याला सुखी जीवनाची प्राप्ती होत असतें, आपण हे ऋण फेडले पाहिजे. आपण आपला 10% पैसा, वेळ, शक्ती समाजाच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे. “जर आदर्श विचाराला आपण प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्यास आपले जीवन नक्कीच सार्थकी लागेल.” यासाठी सर्वांना समाजाच्या विकासासाठी झटले पाहिजे. त्यांनी संचालकपदी नियुक्तीबाबत महाराष्ट्र शासनाचे आभार व धन्यवाद सुध्दा यावेळी मानले.
यावेळी डॉ.सारिका चौधरी, डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. गणेश बहादे, डॉ. विठ्ठल घिनमिने, प्रा.आरती देशमुख, प्रा.नितेश तेलहांडे, प्रा.संजय दिवेकर,नरेश कातडे,शंकर कापसे, संजय पर्बत, प्रीती सायंकार, अंकुश वैद्य, सुरेश तेलतुंबडें, विजयालक्ष्मी जारोंडे, अरुण तिमांडे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.विनोद मुडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.नरेश भोयर यांनी केले.