दिव्यांगाकडून ध्वजारोहन करून जलोष्षात स्वातंत्र्य दिन साजरा

    42

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.15ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने दरवर्षी प्रमाणे वाघोली येथील दिव्यांगानी कारगील युध्दात सहभाग घेतलेले माझी सैनिक मा श्री अनिल सातव याच्या शुभहस्ते ध्वजारोहन करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारत माता कि जय .वंदे मातराम. घोषणा देत जल्लोषात साजरा केला.

    वाघोली केसनद फाटा येथील अंध-अंपग मार्केट समोर साजरा झालेल्या कार्यक्रमात.
    कोरोना रोगराई मुळे सर्वांनी नियमाचे पालन करीत तोंडावर मास.रूमाल लावत .हातावर सॅनिटायझरचा वापर करीत स्वातंत्र्य दिन साजरा केला धर्मेन्द्र सातव. अब्दुल पठाण. शिवाजी सातव.सुप्रिया लोखंडे. .अनिता कांबळे. दत्तात्रय बहिरट. वनिता कोळेकर. गणेश सातव. मनोज दरेकर. छकुलीताई खैमणार.शंकरकाका सातव .नदू कोळेकर. भिमराव डावरे. अनिता रसाळ .मुक्ततेश्वर खैरणार सह बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते