श्री.साईबाबा कला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

    38

    ✒️सचिन महाजन(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9765486350

    वर्धा(दि.15ऑगस्ट):-हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे : दिनांक 15 ऑगस्ट 2020 स्थानिक श्री.साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन व 74 वा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम महाविद्यालयाचे संस्थापक सचिव प्रा.दिवाकर गमे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उत्तम पारेकर, प्रमुख अतिथी संस्था-सहसचिव अविनाश गमे यांच्या उपस्थितीत पार पडला.
    यावेळी डॉ.सारिका चौधरी, डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. गणेश बहादे, डॉ. विठ्ठल घिनमिने, प्रा.आरती देशमुख, प्रा.नितेश तेलहांडे, प्रा.संजय दिवेकर,नरेश कातडे,शंकर कापसे, संजय पर्बत, प्रीती सायंकार, अंकुश वैद्य, सुरेश तेलतुंबडें, विजयालक्ष्मी जारोंडे, अरुण तिमांडे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेश भोयर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विनोद मुडे यांनी केले.