वजीरगाव येथील शाळेत वृक्षारोपण करून मा.आ. वसंतरावजी चव्हाण साहेबांचा वाढदिवस साजरा

27

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.16ऑगस्ट):-१५ ऑगष्ट २०२० कोरोना सारख्या महाभयंकर बिमारी मुळे वातावरणाचें बिघडत चाललेलं संतुलन वातावरणातील बदल रोखण्यासाठी व शाळेतील विद्यार्थ्यांना रम्य परिसरामुळे शिक्षणात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनाचा उत्साह लक्षात घेऊन.

ध्वजारोहण करून नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते तथा शिक्षण महर्षी मा.आ.वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील ढगे व मित्रमंडळाच्या आयोजनाखाली युवक काँग्रेस च्या वतीने वृक्षलागवड हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळीं जि.प.प्रा. शाळा वजीरगाव व राजीव गांधी माध्यमिक विद्यालय वजीरगाव या दोन्ही शाळेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली याप्रसंगी मा.जि.प.अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर ग्रामपंचायत चे सरपंच प्रभाकर वाघमारे ,उपसरपंच जगन पाटील ,मा.पो.पा. उत्तमराव ढगे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष देविदास पाटील ,माजी उपसरपंच भगवानराव पाटील, ग्रा.सदस्य परशुराम पाटील, धोंडिबा पाटील,आनंदराव पो.पाटील, मोहनराव ढगे, बालाजी कोंडामंगल, ग्रामसेवक गजाननराव बच्चेवार, मुख्याध्यापक जि.प. कदम सर,मुख्यध्यपक रा.गां.वि. सूर्यवंशी सर सह युवक काँग्रेस चे कार्यकर्ते ज्यांनी चांगल्या कार्यक्रमाचे नियोजन केले ब्रह्मांनंद ढगे,बळवंत ढगे,पिंटू पो.पा., संतोष ढगे,अंकुश ढगे, मारोती ढगे, गजानन ढगे,विकास ढगे,ओंमकार ढगे,माणिका कोंडामंगल, हणमंत ढगे,वेंकटी वाघमारे,मारोती वाघमारे, शिक्षकवृंद, प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आता .