कुही तालुक्यातील कुजबा गावातील शेतकऱ्यांची आमदार राजू पारवे यांनी घेतली भेट

47

✒️कुही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कुही(दि.1ऑगस्ट):-कुजबा येथील शेतकरऱ्यानी आमदार राजु पारवे यांना दिलेल्या निवेदना नुसार आमदार राजु पारवे यांनी कुजबा गावातिल शेतकऱ्याना भेटुन आमनदी च्या तिरा पर्यंत जाऊन थेट पाहणी केली.तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, गोसेखुर्द धरणाच्या बैक वाटर मुळे पूर्वीचा वईवाटिचा रस्ता पाण्याखाली आल्याचे लक्षात आले,यामुळे शेतकऱ्याना शेतीवर जाऊन वईवाट करता येत नाही या विषयावर घेऊन शेतकऱ्याशी संवाद साधुन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार राजु पारवे, जि.प. सदस्य भोजराज ढवकर ,प.स. सदस्य वंदनाताई मोटघरे ,अध्यक्ष कुही तालुका काँग्रेस उपासराव भुते, अरुण हटवार ,मनोज तितरमारे ,महादेवराव जिभकाटे संदिप खानोरकर ,नंदाताई तिजारे, शफी कुरेशी ,कुकडे प्रकाश लांबट,कुकडे रमेश तिजारे, सुरेश कुकडे बं,लांबट शंकर बांडाने, समीर कुरेशी उपाध्यक्ष कुही तालुका व अध्यक्ष कुजबा युवक काँग्रेस ,तरंग कुकडे, भुषण भोंगाडे, रोहित भगत, आकाश शिंगाडे ,शाकिर कुरेशी ,पवन चादेकर तसेच युवक काँग्रेस कुजबा व गावातील शेतकरी व नागारिक उपस्थित होते .