जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त बाल साहित्यिक समृद्धी शिक्षण या समूहातर्फे बालकांसाठी घेण्यात आला विशेष उपक्रम , राज्य भरातून होतंय त्यांच कौतुक

  49

  ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

  बीड(दि.16ऑगस्ट):- जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त बाल साहित्यिक समृद्धी शिक्षण या समूहातर्फे, घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.या स्पर्धेला राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला हे विशेष.

  शालेय वयातच विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीची गोडी लागावी. त्यांच्यातील बालसाहित्यिक शोधून त्याला थोर साहित्यिक घडवण्यासाठी समूह संचालक श्री सोमनाथ गायकवाड व ओंकार भोई हे बाल साहित्यिक समृद्धी शिक्षण हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात राबवित आहेत.

  बाल साहित्यिक समृद्धी शिक्षण या ग्रुपवर स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला रात्री ९ वाजता निकाल जाहीर झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अनिल आर. महाजन (वरीष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक रत्न प्रा. रावसाहेब बी राशिनकर यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमासाठी तज्ञ परिक्षक म्हणून , प्रसिद्ध कवी शाहीर थोर साहित्यक श्री.खंडू माळवे सर तसेच प्रसिद्ध कवी, अभिनेते-दिग्दर्शक हृद्यमानव अशोक व प्रसिद्ध पत्रकार कविवर्य श्री.अंगद दराडे सर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी खूप सुंदर व सर्वमान्य निकाल जाहीर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र तंत्रस्नेही समूहाच्या राज्यसमन्वयक श्रीमती क्रांती महेरे मॅडमनी खूप सुंदररित्या केले.

  हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी समूह संचालक श्री सोमनाथ गायकवाड व श्री ओंकार भोई सर व MTS समूहाने विशेष योगदान दिले. हा उपक्रम अविरतपणे चालू राहिल व यातून भविष्यात थोर साहित्यक घडतील असा विश्वास मान्यवरांनी दिला. बालसाहित्यिक समृद्धी शिक्षण हा समूह बाल साहित्यिकासाठी एक दिशादर्शक ठरेल असा विश्वास पालकांकडून आला. या स्पर्धेचे राज्यभरातून कौतुक होत आहे. निकाल पुढील प्रमाने ,उच्च प्राथमिक गट, सर्वोत्कृष्ट अस्मिता मोडुरले, उत्कृष्ट, अथर्व दळवे, प्रथम, अनुश्री बडदे, द्वितीय, साई पाटील, तुतीय, मनश्री कडवदुकर उत्तेजनार्थ , सुदर्शन खोडदे, आनंद हरकुळकर, अनिकेत गोरे, माध्यमिक गटातील सर्वाेत्कृष्ट..कु – आलिशा संदिप पाेवार इ.8वी, उत्कृष्ट..कु – शिवाणी विठ्ठल माेहिते इ.8वी, उत्तेजनार्थ..कु – रुतूराज जाेगेंद्र गावित इ.10वी, श्रुती विनाेद हाजवळे इ.8वी, कु – सुदेश याेगेश महाशब्दे इ.10वी, तृतिय क्रमांक..कु.खंडेराज बळीराम वारकर इ.8वी, द्वितिय क्रमांक..कु – प्रेक्षा अभिजित थरवळ इ.9वी, प्रथम क्रमांक..कु – वरदा विनाेद गायकवाड इ.9वी.प्राथमिक गट सर्वोत्कृष्ट वैष्णवी बालाजी देशमुख , उत्कृष्ट. कार्तिक दिलीप धायगुडे, प्रथम आरूष प्रशांत देठे , द्वितीय.ज्ञानदा सचिन सोनवणे , तृतीय.कु आदिती संदीप सावंत , उत्तेजनार्थ
  (१)श्रावणी गोवर्धन मगर , (२)शर्वरी सचिन वाबळे
  (३)लवेश निवृत्ती पिंगळे .अश्या प्रमाने आहे .