सहकार नेते स्व.भाई हरिभाऊ बडे यांच्या कुटूंबियांची घेतली मान्यवरांनी भेट

    36

    ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.16ऑगस्ट):-परिसरातील सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते भाई हरिभाऊ बडे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यांचा कुटूंबियांचे सांत्वन करण्याकरिता माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके , अशोकराव डक , बंडू होरमाळे यांनी भेट दिली.

    स्व. भाई हरिभाऊ बडे यांचे निधनामुळे सहकार क्षेत्र व परिसरातील राजकारण पोरके झाले आहे, याबाबतची जाणीव सर्वाना आहे. त्यांनी केलेले कार्य पुढेनेने हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,बडे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करेल असा विश्वास आहे. बडे कुटूंबियांना स्व. हरिभाऊ बडे यांची उणीव भासणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी व्यक्त केले.