स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कापशी गुंफा येथे भव्य रक्तदान शिबिर

  41

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:- 7757073260

  नांदेड(दि.17ऑगष्ट):-भारतीय स्वातंत्र्य दिन व देशावर आलेले कोरोना सारख्या महामारीचा सामना करतेवेळी उद्भवणारी
  भयावह परिस्थिती व गरजू रुग्णांना होत असलेला अपुरा रक्त पुरवठा लक्षात घेऊन वाढत्या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या परिसरातील युवकांकडून काही तरी सेवा घडावी या हेतूने श्री संत बाळगीर महाराज मठसंस्थान (कापशी गुंफा)येथ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक युवा कार्यकर्ते अंकुश पाटील कोल्हे व भागवत पाटील ढेपे यांच्याकडून करण्यात आले होते .
  या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उदघाटन श्री संत देवगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले
  तर अध्यक्षस्थानी श्री मधूकर पाटील ढेपे सरपंच कापशी (खु.) हे होते .
  सदर रक्तदान शिबिरास नायगाव तालुक्यातून भेट देण्यासाठी आलेले काँग्रेस कार्यकर्ते गणेश पाटील ढगे वजीरगावकर व ब्रह्मानंद ढगे,गजानन ढगे,ओमकार ढगे,अंकुश ढगे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदानाचे महत्व व आयोजकांचे
  मनोबल वाढण्यास रक्तदान करून सहकार्य केले .
  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर शिंदे हरबळकर, प्रवीण जाधव,बालाजी पाटिल सांगवीकर, कृष्णा मांजरमकर, शिवा, दिक्षीत, शुभम, पवन, शिवराज, सचिन पाटिल, साई पाटिल व गावातील तरुण मंडळी या सर्वांचे सहकार्य लाभले . तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण माधव ढेपे , संदिप मेथे , मनोहर कांबळे, सुरेश पाटील उमरेकर,खंडू पाटील सावळे शिवप्रसाद ढेपे, माधव मेथे , व समस्त गावकरी मंडळी कापशी (खु.) यांचे सहकार्य लाभले .

  याप्रसंगी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी
  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांचेच शिवश्री अंकुश पाटील कोल्हे यांनी आभार व ऋण वक्त केले .