अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या ,बीड युवक जिल्हा उपाध्यक्षपदी नामदेव गायकवाड

  41

  ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

  परळी(दि.17ऑगस्ट):-अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या बीड युवक जिल्हा उपाध्यक्षपदी नामदेव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

   नामदेव गायकवाड हे गेली अनेक वर्ष समाजातील तळागाळातील समाजबांधवांना सहकार्य करण्याचे काम करत आहेत तसेच त्यांचे सामाजिक कार्य व क्रीडा क्षेत्रामध्येही चांगले नाव आहे.

      ते व्यवसायाने शिक्षक असून समाजातील तरुणांना मध्ये व्यसनमुक्त युवक घडवण्याचे कार्य केलेले आहे.या नियुक्तीची शिफारस अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव, बीड जिल्हा कार्याध्यक्ष गोरखजी मेंडके ,बीड जिल्हा सचिव बापूसाहेब जाधव तसेच महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड, मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडीराम जाधव ,मराठवाडा सचिव दिगंबर जाधव, मराठवाडा उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे.

     या सर्वांच्या शिफारशीवरून माननीय नामदेव गायकवाड यांची नियुक्ती महासंघ राज्य कार्यकारिणीने केली आहे.नामदेव भाऊ आपल्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील समाजाचे चांगले संघटन उभे राहून समाज विकासाच्या कार्याला गती मिळेल ही आपणाकडून राज्य कार्यकारिणीला अपेक्षा आहे.असे नियुक्ती पत्रात नमूद आहे.त्यांचा नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.