✒️नवनाथ आडे(गेवराई,प्रतिनिधी)

मो:-९०७५९१३११४

गेवराई(दि.22ऑगस्ट):-करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणून दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या शासनाच्या योजना आहेत, दिव्यांगासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी मनरेगा योजना जाहीर केली आहे आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांचे ग्रामपंचायत मध्ये नोंदणी केलेली नाही तरी सर्व ग्रामपंचायत यांनी दिव्यांग बांधवांची ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक व मनरेगा सेवक यांनी ऑनलाइन नोंदणी करून घेऊन बांधवांना जॉब कार्ड देऊन दिव्यांग बांधवांना काम जमेल ते देऊन शासनाच्या आदेशाचे पालन करावे, परंतु त्यानुसार दिव्यांगांना रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच मिळणार होते.. मग हा हक्काचे राशन किराणा साहित्य हक्काचा निधी घरकुल विना अट
विहीर विना अट ५ टक्के निधी कुठे गेले, कुणी खाले, आम्ही चेकरा…पे चकरा हाच खेळ आमच्या नशिबी आहे का? गेवराई तालुक्यात गोर गरिब दिव्यांग यांच्या नावाखाली राजकारण चालू आहे की काय.. दिव्यांगांना हक्काचे राशन, किराणा किट, हे गेले कुठे….दिव्यांग बांधवाच्या नावाखाली स्वतः ची भरणी हा काळाबाजार अजून किंती दिवस चालणार असा प्रश्न गेवराई तालुक्यातील दिव्यांगांना पडला आहे..जिथे शासन स्तरावर हक्काची मदत कमी तिथे सुनील ठोसर मित्र परिवार बीड जिल्हा प्रमुख यांच्या वतीने काल, आज आणि उद्या कायम मदतीचा कुंड अविरत चालू आहे याबाबत अनेक लोक आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांच्याशी बोलताना सांगितले..सुनिल ठोसर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा प्रमुख प्रमोद डोंगरे यांनी हे निवेदन दिले..

बीड, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED