रक्तदान करून वाचविले एका रुग्णाचे प्राण

17

✒️रोशन मदनकर(ब्रम्हपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.22ऑगस्ट):-लाईफ फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी चे सक्रिय सदस्य, नेहमी सर्वांना मदत करणारे, मनमिळावू अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले, पवनी तालूक्यातील सावरला या छोट्याश्या गावातील रहिवासी मा.राहुलभाऊ शेंडे यांनी आज दि.२२/०८/२०२० रोजी ख्रिस्तानंद रुग्णालयात जाऊन मा.सिद्धार्थ जाम्बूळे (रा.हनुमान नगर, ब्रम्हपुरी) यांना रक्तदान केले.

सदर रुग्ण, मागील तीन दिवसांपासून ख्रिस्तानंद रुग्णालय ब्रम्हपुरी मध्ये मधुमेहाच्या त्रासामूळे उपचार करीत होते.आज त्यांना ICU (अति दक्षता विभाग) मध्ये भरती करण्यात आले असता, रक्ताची गरज भासली होती.त्यावेळेस मा.राहुल भाऊ शेंडे यांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रुग्णाच्या परिवाराने मा.राहुल भाऊ शेंडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच लाईफ फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी चे सक्रिय सदस्यांनी मा.राहुल भाऊ शेंडे यांना आभार मानून त्यांचे कौतुक केले. आणि त्यांच्या समोरच्या कार्याला शुभेच्या दिल्या.