गेवराई तालुक्यात घरकुलच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर कडक कारवाई करा

31

▪️रयत शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बाबुराव भोईटे

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:- 9075913114

गेवराई(दि.23ऑगस्ट):-आपणास घरकुल मंजूर झाले आहे. त्यासाठी असे पत्र लागते ते आम्ही मिळवून देऊ असे सांगून काही राजकीय बगलबच्चे लोकांची फसवणूक करत आहेत अश्या बदमाश लोकावर कारवाई करावी. अशा लोकांवर समाजातील चुकीची माहिती देणाऱ्या वर तत्काळ कारवाई करावी. घरकुलची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांनी करायची असते पण गावातील सरपंच उपसरपंच हे लोक ज्या गरिबाला घरकुल मिळाले आहे त्या गोरगरीब लोकांना पैसे मागतात जर नाही दिले तर तुमचं घरकुल रद्द करू अशी गोरगरीब लोकांना गावातील सरपंच उपसरपंच धमकी देतात व त्या गरीब लोकाकुन पैसे काढण्याचा गोरख धंदा ह्या लोकांनी चालू केला आहे अशा सर्व सरपंच उपसरपंच यांच्यावर संघटने मार्फत कारवाई करणार ज्यांना खरचं घरकुलची गरज आहे त्यांना घरकुल मिळत नाही ज्यांच्याकडे मोठा बंगला आहे त्यांना घरकुल मिळतंय ह्या मधल्या नालायक लोकांमुळे गोरगरीब लोकांना त्यांच्या हक्काच्या योजना मिळत नाहीत. गोरगरीब लोकांना वेठीस धरणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येईल असे मत रयत शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष गेवराई बाबुराव भोईटे यांनी मांडले आहे.