बीड जिल्हा कारागृहात 59 कैदी पॉझिटिव्ह

    43

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:- 9075913114

    बीड(दि.24ऑगस्ट):-जिल्ह्यात रविवारी नव्याने तब्बल 128 रूग्ण निष्पन्न झाले आहे. महत्वाचे हे की यात बीड जिल्हा कारागृहातील तब्बल 59 कैद्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यात सर्वाधिक 76 रूग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी सकाळी जिल्ह्यातून एकूण 904 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 128 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 776 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधीत रूग्णांमध्ये अंबाजोगाई शहरातील 8, आष्टीमध्ये 8, बीड 76, धारूर 3, गेवराई 6, केज 4, माजलगाव 2, परळी 17, वडवणी 3 आणि पाटोदा तालुक्यात एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 3954 इतकी झाली असून यापैकी 2051 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 99 रूग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात 1804 रूग्णांवर उपचार सुरू आहे.