अहेरी तालुका शिवसेनेचे अक्षय करपे व दिलीप सुरपाम यांना दिला पक्ष कार्यवाहीचा नोटीस

28

🔺गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार यांची कारवाई

✒️संतोष संगीडवार(आल्लापली प्रतिनिधी)

मो:-७९७२२६५२७५

आल्लापली(दि.२४ ऑगस्ट) :- शिवसेना अहेरी तालुका प्रमुख (प्रभारी) अक्षय करपे व अहेरी विधानसभा युवा जिल्हा प्रमुख दिलीप सुरपाम यांच्या वैयक्तिक मतभेद व भांडणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्यामुळे दि. २१ ऑगस्ट पासुन दोघांनाही पदाचा वापर करू नये अशी ताकीद देणारे पत्र गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार यांनी दिल्यामुळे या परिसरातील राजकारणात खमंग चर्चेचा विषय ठरला आहे.

अहेरी तालुका शिवसेनेचे अक्षय करपे व दिलीप सुरपाम यांच्या वैयक्तिक मतभेद व भांडणामुळे पक्षाला बळकटी मिळण्याऐवजी प्रतिमा मलीन होत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर यापूर्वी दोघानाही जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांनी एकत्र बसवून समजविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यानंतर सुद्धा 20 ऑगस्ट रोजी बोरी येथील उपहारगृहात दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण सारखा प्रकार केला आहे. या परिसरातील जनतेने हा दोघांचाही गोंधळ पाहून शिवसेना पक्षाबाबत उलटसुलट चर्चा केल्या. त्यामुळे पक्षाची बदनामी झाली.

त्यामुळे सहा महिन्याकरिता दोघांनाही पदमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे हे शिवसेना पक्षाचे असून ते या प्रकाराबद्दल कोणती भुमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.