नांदेड जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्राच्या दुरुस्ती व साहित्य उपलब्ध करून द्या – वसंत सुगावे

20

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-77570376260

नांदेड(दि.24ऑगस्ट):-जनसामान्यांचे आरोग्याच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी आरोग्य मंत्री मा. नामदार राजेश भैय्या टोपे यांच्याशी काल जालना येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व घुगराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ मंजूर करून द्यावे व नांदेड जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्राच्या दुरुस्ती व साहित्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवेदन दिले व सकारात्मक चर्चा झाली.