ई-पास त्वरित रद्द करा या मागणीकरीता प्रहार चालक मालक संघटनचे उपविभागीय अधिकारीस निवेदन सादर

33

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.25ऑगस्ट):-मागील 5 महिन्यापासुन कोविड-19 मुळे पूर्णपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवसायीकावर बेकारीची कुर्हाड पकोसळली असून पर्यटन क्षेत्रासि निगडित सर्व वाहन चालक मालकावर उपासमारीचि वेळ आली आहे, या संदर्भात जिल्ह्य बाहेर जाण्याकरिता ई-पास ची शक्ती रद्द करण्याकरिता प्रहार चालक मालक संघटना चिमुच्या वतीने मुख्यमंत्रयाना उपविभागीय अधिकारी चिमुर यांना देण्यात आले.

20 ऑगस्ट पासून राज्य परिवहन महामंडळानच्या एस टी बसेस सुरु करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकार ने दिली आहे, परंतु खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक मालकावर ई-पास सक्ती केली आहे, काळी-पीवळी व खाजगी वाहन वाहतुकीला ई-पास सक्ती केल्यामुळे प्रवाशयांची पन उड़त आहे, महाराष्ट्र राज्य सरकार खाजगी चालक मालक संघटनेवर अन्याय करीत आहे, त्या करिता ई-पास त्वरित रद्द करुन दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात यावी या मागणी साठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनां उपविभागीय अधिकारी चिमुर यांचे मार्फ़त प्रहार चालक मालक संघटना शाखा चिमुर च्या वतीने निवेदन देण्यात आली.

यावेळी प्रहारचे राज्य संघटक प्रवीण वाघे, चिमुर तालुका अध्यक्ष राजू सोनवाने, भूषण चाफले, आतिश पिसे, प्रदीप बोरसरे, अमोल पिसे, अमित कामडी उपस्थित होते.