शेतकरी बांधवांची मुग खरेदीची लूट थांबवा – सुनील ठोसर

27

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.26ऑगस्ट):-बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मूग खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शासनाचा मूग खरेदी करणे हमीभाव ७५०० रुपये असताना खाजगी खरेदी व व्यापारी केवळ ४७०० ते ५००० रुपये दर देत असून २५०० – ३००० रुपयाचे नुकसान होत असताना सगळे गप्प का ?सततच्या पावसामुळे मुगाची तोडणी दोन वेळा करूनही बऱ्याच शेतात कर उगवले आहेत याकडे कुणीही जबाबदार अधिकारी व लोकप्रतनिधींनीही लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी बंधूंनी आमच्या विविध भागातील विविध पदाधिकारी व रयत शेतकरी संघटना बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर माझ्या मोबाईल फोन करून सांगितले असून आम्ही मायबाप शेतकरी बांधवांच्या समस्या वाढवणाराला कदापिही सोडणार नाही त्या मध्ये हमाली, अडत अशी लूट चालू असताना कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही शेतकरी आधीच दुष्काळ, कोरोना,सावकार, बँकेचे व सरकारच्या तारीख पे तारीख पीककर्ज साठी चालढकल अश्या विविध अडचणीत सापडले आहेत तरी तत्काळ शासनाने मूग गिळून न बसता मूग खरेदी केंद्र सुरू करून शेतकरी बांधवांना चुकोरे , रक्कम त्वरित द्यावी यामध्ये दिरंगाई झाली तर आम्ही अड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात आमरण उपोषणाला आसूड घेऊन बसणार असून शासनाला कुठलीही सूचना न देता बीड जिल्हा अधिकारी यांनी बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तत्काळ खरेदी करण्याचे आदेश देऊन शेतकरी बांधवांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. थोडी तुमच्या मनाने खरेदी केंद्र सुरू न करता अधिकारी फक्त पगाराचे भवले आहेत का?
मागील तुरीचे पैसे देण्यास कुणीही बोलायला तयार नाही सगळ्यांनी वाटून घेतले की काय असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडलाय तुरीचे पैसे लवकरात लवकर न मिळाल्यास पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा वळवला जाईल असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर यांनी दिला आहे माजलंगावं तालुका प्रमुख राजे भाऊ मोरे, गेवराई बाबुराव भोईटे, अंबेजोगाई अर्जुन चाटे, बीड राम नवले, प्रमोद डोंगरे, भारत हतागळे व बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर पाटील परिवार रयत शेतकरी संघटना यांनी खणखणीत इशारा दिला आहे