पावडर कोटिंगच्या दुकानात स्फोट एक ठार; तिघे जण गंभीर जखमी

35

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.26ऑगस्ट):-पावडर कोटींगच्या गॅस गळती होवून स्फोट झाल्याने ३० वर्षीय तरूण गंभीररित्या जखमी होवून ठार झाल्याची घटना पांगरी रोडवरील करपरा नदीजवळ आज दुपारी घडली. यात अन्य तिघे जण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट झाल्यानंतर करपराचा परिसर हादरून गेला हेाता. संतोष गिराम (वय ३०, रा.गिरामनगर बीड) या तरूणाचे पांगरी रोडवरील करपरा नदीजवळ पावडर कोटींगचे दुकान आहे.दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान गॅस गळती होवून त्याचा स्फोट झाला. यात संतोष गिराम हा तरूण गंभीररित्या जखमी होवून ठार झाला. तर काम करणारे अन्य तिघेजण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर करपरानदीचा परिसर हादरला होता. स्फोट होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.