अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या: राम पाटील बोरकर

43

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)
मो:-8308862587

सेनगाव(दि.26ऑगस्ट):-गेल्या दहा ते पंधरा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी वाशिम जिल्हा भूमिपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना केली आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना वाशिम जिल्ह्यातील गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी खरिपातील बोगस बियाणे उत्पादक कंपन्या यांच्या गोरख धंद्यामुळे वाशिम जिल्ह्यातील 25 टक्के शेतकरी दुबार तिबार पेरणी करूनही उत्पादनापासून वंचित राहिला आहे. खरिपातील पिक‌ हातात येण्याची वेळ निर्माण झाली असताना अजूनही 50 टक्के कर्जापासून आणि पीककर्जापासून वंचित आहेत. असे असूनही शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर पेरणी केली. उडीद, मुग, सोयाबीन, कापूस व हळद आणि अन्य पीक जोमात असताना गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून हातातोंडाशी आलेली पावसामुळे पिके खराब व्हायला लागली आहेत. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी भूमिपुत्र संघटनेच्या वतीने केली आहे.