जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्ह्याच्या वतीने तालुकानिहाय नियुक्त्या

    37

    ✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)
    मो:-8308862587

    सेनगाव(दि.26ऑगस्ट):-जगदंब ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शुभम भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रेम नागरे व उपाध्यक्ष बाळू घुगे यांच्या अध्यक्षतेखाली सेनगाव तालुका प्रमुख पदी जनार्दन पुरी व उप तालुका प्रमुख पदी गजानन गव्हाणे तसेच शहर प्रमुख पदी नवनाथ गिरी यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जगदंबा युवा ग्रुप चे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल दादा मोहनकर, प्रदेश उपाध्यक्ष अजय दादा मुंडे, प्रदेश सचिव वैभव जुनघरे हिंगोली जिल्हा अध्यक्ष प्रेम नागरे, जिल्हा उपाध्यक्ष बाळू घुगे, जिल्हा सचिव वैभव आघाव व तसेच अनेक शिवभक्त व इतर जगदंबा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.