दिव्यांग बांधवाना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रहार स्टाइल ने आंदोलन करणार

30

▪️ तालुका अध्यक्ष,नंदकुमार झाडे

✒️ देवराज कोळे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.26ऑगस्ट):-नामदार बच्चु भाऊ कडु यांच्याआदेशाने गेवराई तालुक्यातील अपंग, विधवाना न्याय मिळवुन देण्यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समिति कार्यालय गेवराई या ठिकानी सतत पाठपुरावा करूनही हे मुजोर अधिकारी विधवा,अपंगाना ञास देण्याचे काम सातत्याने करत आसल्याचे लक्षात आले आहे,कारण तालुक्यातील खरे दिव्यांग बांधव संजय गांधी निराधार योजनेपासुन आजुनही वंचित आहेत,तसेच त्याना आंत्योदय योजनेचे राशन कार्ड आजुनही मिळत नाही,पंचायत समितिचे गटविकास अधिकारी साहेब यांना स्वतः मा बच्चु भाऊ नी 5% अपंगाचे आनुदान तात्काळ वाटपाचे भ्रमनध्वनी वरून आदेश देवुनही याचा कसलाही परिणाम बी डी ओ साहेबांवर दिसत नसल्याने, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना गेवराई च्या वतीने तहसील कार्यालय व पंचायत समिति कार्यालय गेवराई येथे सप्टेंबर महिण्यात विधवा अपंगाना न्याय देण्यासाठी टाळाटाळ करत आसलेल्या या मुजोर अधिकार याच्या कार्यालयालया समोर प्रहार स्टाइल ने आंदोलन करणार आसल्याचे तालुका अध्यक्ष मा नंदकुमार मा नंदकुमार झाडे यांनी निवेदन देवुन सागितले आहे या वेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा राजेंद्र अडागळे, तालुका उपाध्यक्ष विकास गायकवाड़ तालुका मार्गदर्शक कचरू मामा पवार व नारायण मामा सरक महिला आघाडी प्रमुख पद्मिनी तारडे व कुसुम माळी, गुलाब झाडे, लखन कासार, महेश झाडे, मुक्तार शेख, राम उबाळे सर,भागवत गायके,बालु धोडरे, पवार विश्वनाथ,पवार जनार्दन, साबळे मामा,मूसळे मामा,जयश्री वेल्हाळ,राऊत मामा,प्रविण खेञै,भिमा लोढे, राजु शेख, आलताफ शेख, आदि दिव्यांग बांधव उपस्थित होते.