मतलबी सरकार स्वार्थी राजकारणी भाविकांच्या श्रध्देचा विचार करतील का..! सुनील ठोसर

27

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.30ऑगस्ट):-बीड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी सर्व धर्माचे,पंथाचे, सर्व देवदेवतांचे मंदिर, समाज मंदिर,आश्रम,मठ , मशिजीत, दार लुम बंद ठेऊन सरकार सर्व भाविकांच्या व वेगवेगळ्या धर्माच्या भाविकांच्या भावनेशी खेळत असून याचा विचार करत नसतील तर त्यांनी ज्या देशात धार्मिक अध्यात्मिक गुरू नाही.

अश्या देशात रहिवाशी व्हावे सर्व पंथाच्या , धर्माच्या वरिष्ठ, गुरुवर्य,महाराज,सेवेकरी,टाळकरी,वादक,गायक,भजनी,पहारेकरी,भागवत कार, कीर्तन कार, व्याख्यान कार, प्रवचन कार, अध्यात्मिक व धार्मिक बाजू कुठलीही समजून घेण्यासाठी हे सरकार अपयशी ठरत असून जाती धर्माच्या नावाखाली फक्त राजकीय झोळी घेऊन फिरतात हे सुजाण नागरिक बोलत आहेत यापुढे कुठल्याही राजकीय नेत्याला गेटवर सुद्धा जनता उभा करील यात शंका नाही.

उलट कोरोंना महामारित आपापल्या सत्तास्थाने , गुत्तेदार, माफिया यांचे मार्फत नेतेमंडळी मलिदा ओढत ओढत शासनाच्या हजारों जनतेच्या विकासासाठी विविध विभागांचा समावेश असून हजारो योजना आहेत पण बीड जिल्ह्यातील कुठल्याही एका तरी नेत्यानं आमच्या समक्ष एक योजना प्रभावीपणे राबवलेली दाखवावी हा आमचा रयत शेतकरी संघटनेचा जाहीर सवाल असून कुणीतरी दाखवा ….बक्षीस मिळवा वरून रयत शेतकरी संघटना जाहीर अश्या नेत्याची जाहीर मिरवणूक काढत जाहीर सत्कार करू असे बीड जिल्हा प्रमुख सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले यापुढे बीड जिल्ह्यातील सर्व देवस्थाने,मठ,मंदिर,आश्रम आदी खुली करावे नसता रयत शेतकरी संघटना बीड जिल्हा आंदोलन सुरू करेल अश्या परस्थितित सरकारने गोरगरिबांना व सर्व जाती धर्मातील भाविकांना वेठीस धरत आपल्या तिजोरी भरण्याचा गोरज धंदा बंद ठेऊन निवडणुकीत भावनिक न होता.

भाविकांच्या भावनेचा आदर करावा नसता रयत शेतकरी संघटनेच्या वतीने हॉटेल, मोठमोठे सर्व अजेन्सी,दुकाने, शोरुम बंद करून जबाबदार अधिकारी यांचेकडे चाव्या जमा करण्यात येतील बीड जिल्ह्या अधिकारी यांनी तत्काळ बैठक घेऊन सर्वांना आदेश काढण्यात यावे असे आवाहन बीड जिल्हा प्रमुख रयत शेतकरी संघटना सुनील नानासाहेब ठोसर पाटील, राजे भाऊ मोरे, प्रमोद डोंगरे, अर्जुन चाटे, राम नवले, माऊली नवले, भगवान कदम, अक्षय माने, आदित्य ठोसर, नवनाथ भाऊ आडे,सतीश घोरपडे, रमेश राठोड, गुरु हतागळे, शिवदास साळुंके, नईम अत्तार, संकेत वारांगे, संग्राम ढोले, अमोल भोकरे, बाबुराव भोईटे, राहुल सेट, नितीन जाधव, आकाश जाधव, पपू शिंदे, विष्णु काकडे, अशोक शेंडगे, गणेश यामगार व सर्व महाराज,हजी,सेवेकरी,विनेकरी,पुज्यारी,कीर्तनकार, भारुडकर,प्रवचनकार,भागवत कार, कथा कार,भजनी आदींच्या माध्यमातून करण्यात येत आहे लवकरात लवकर निर्णय सरकारने घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो.