✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

हिंगोली(दि.30ऑगस्ट):-जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघातील बोथी येथे ओ टि एस पी व ठक्कर बाबा योजनेअंतर्गत रस्ता, सभाग्रह व फ्लेवर ब्लॉक या कामांचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री संतोषराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सहसंपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे, हिंगोली चे नगरसेवक रामभाऊ कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालाजी पाटील बोंढारे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाजीराव सवंडकर, गट विकास अधिकारी डॉक्टर आंधळे साहेब, ग्रामसेवक काकडे,ग्रामपंचायत प्रशासक पाईकराव, बाबुरावजी खंदारे, माजी सरपंच कलावतीबाई बाबुराव खंदारे, चेअरमन शेकुराव पाटील, दिषा समिती सदस्य अंकुश शेळके, शिवसेनेचे सर्कल प्रमुख सोमनाथ रणखांब व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोथी येथील अपंग दिगंबर बोंबले, राहुल सावळे, भीमराव सावळे, सुदाम काळे, ओमकार नवले यांना ग्रामपंचायत मार्फत आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले व आशा सेविकांना मास्क सैनीटायझरचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED