सौंदर्य

26

सौंदर्य बघायला ते उपभोगयला प्रत्येकास आवडते. निसर्ग तर रुप बदलून रंगाची उधळण करून सौंदर्यात भर घालत असतो.
सौंदर्य कशा कशात असते.
1 निसर्ग 2 रूप 3आवाज 4 कलाकृती..
अशी अनेक उदाहरणे आहेत. पण लोक सौंदर्य म्हटल की रुपाचे वर्णन सुरू करतात. ज्या नजरेतून तुम्ही विधात्याच्या रचनेकडे पाहाल त्याप्रमाणे तुम्हांला त्यातील सौंदर्य ओळखता येईल.
माणसाल सौंदर्य आवडले की तो प्रेमात पडतो. तिच्या रूपावर भाळतो. ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. कधीकधी तर तो इतका बेधुंद होतो नशेच्या आहारी जातो. कधी निर्जन स्थळी एकट गाठून ते ओरबाडून घेतो. त्याने तर निसर्गालाही सोडले नाही. निसर्ग ओरबाडून टाकला. असे हे नैसर्गीक सौंदर्य माणसाला सुखावते तर कधी मोहात पाडते. अहो! आपल जाऊ द्या देव सुद्धा राक्षस सुध्दा सौंदर्याने मोहित होऊन चुकीच कृत्य करतात व शाप उपशाप चे खेळ खेळतात. रावण सीतेच्या सौंदर्यावर भाळला व तिचे हरण केले.

सौंदर्य जस देवाने निर्मिल आहे. तसेच माणसाच्या अंगात इतके चांगले कलागुण आहेत की तो स्वतःच्या कल्पनेतून छान कलाकृती लोकांसमोर सादर करतो.
सौंदर्य तर चिखलात पण असते म्हणून त्यातूनच सुंदर कमळ उगवते. सौंदर्य हे बाहेर मनाचे असते तसेच ते आंतरिक मनाचे पण असते. मनाचे सौंदर्य हे सगळ्यांना पटकन समजत नाही. काही लोक स्वभावाने खुप लाघवी असतात. पटकन माणस जोडण्याची कला त्यांना अवगत असते. ह्या स्वभावाला मनाचे सौंदर्य म्हणतात. काही लोक बाह्य रूपावर भाळतात पण ती फक्त शो ची बाहुली आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा भांडणे होतात घटस्फोट होतो. म्हणून निवड करताना नेहमी बाह्य रुपा बरोबर आंतरिक रूप जाणून घ्या त्या व्यक्तीचे वागणे बोलणे चाल चलन ह्याचा अभ्यास करून निवड केल्यास ती कधीच चुकत नाही.

शरीराचै सौंदर्य हे काही काळानंतर काळाच्या ओघात संपून जाते. मनातील आंतरिक सौंदर्य हे चिरकाल टिकणारे असते. उदा…. लता मंगेशकर अमिताभ बच्चन हे जाताना मागे स्मृती ठेवून जाणार आहेत कारण आवाजातील सौंदर्य त्यांना देवाने बहाल केले आहे.

आपण सर्व आजपासून चिरकाल सौंदर्याची व्याख्या समजून सतत त्याचे चिंतन मनन करू हळूहळू का होईना ते सौंदर्य आपल्या स्वभावात उतरेल व तो फरक नक्कीच आपल्यापेक्षाही समोरच्या व्यक्तीला चटकन लक्षात येईल.
मानवा तू आहेस सौंदर्याची खाण
निसर्गा तू आहेस सौंदर्याचा साज
!! आज घेऊ शपथ आपण जपू सौंदर्य मानवाचे आणि निसर्गाचे !!

                       ✒️लेखिका:-सौ. रोहिणी अमोल पराडकर
                                                        कोल्हापूर
                                                 मो:-8208890678

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620