भारतीय विद्यार्थी संघटना बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी ‌विजय शिवाजी बडे यांची नियुक्ती

17

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.31ऑगस्ट):-सामाजिक परिवर्तनाची आस व नेतृत्व गुणाची दखल घेऊन विजय शिवाजी बडे यांची भारतीय विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, भारतीय विद्यार्थी संघटना बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे, आपण आपल्या कौशल्याने विद्यार्थी वर्गात योग्य तो न्याय सामाजीक कार्याचा पाठपुरावा करून भारतीय विद्यार्थी संघटनेचे कार्य सर्व स्तरावर सर्वतोपरी पोहोचविण्यात प्रयत्न करून लौकिक प्राप्त करावे, आपण मार्फत कोणत्याही गैरकृत्य होणार नाही जेणेकरून आपले आणि आपल्या संस्थेचे नाव बदनाम होईल याची दक्षता बाळगणे आपले कर्तव्य असेल, गैरवर्तन निदर्शनात आल्यास त्याबाबत सर्वतोपरी निर्णय हा भारतीय विद्यार्थी संघटना मुख्य कार्यकरिणीचा असेल आपण त्यास बांधील आहात आणि हे सर्व आपणास ज्ञात आहे ,असा उल्लेख आहे,
विजय बडे यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे चाहत्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.