महिला पोलीस कर्मचारी वर्षा थडवे यांनी केली महिलेला मदत

    39

    ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.2सप्टेंबर):-दिनांक 31ऑगस्ट रोजी रात्री 9-30 च्या सुमारास गंगाखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक महीला व तिच्या सोबत तिचे 5 ते 7 वर्षाचे मुलं होते ,ती संशयास्पद अवस्थेत बसली होती , कोरोनामुळे संचारबंदी असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती ,त्यामुळे या महिलेकडे कोणाचे लक्ष नव्हते, याच वेळी गंगाखेड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी वर्षा थडवे या आपल्या दुचाकीवरून जात होत्या, यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्त्या सुर्यमाला मोतीपवळे होत्या.

    या दोघींचे लक्ष या महिलेकडे गेले. त्यांनी या महिलेच्या जवळ जाऊन विचार पुस केली असता या महिलेने रागाच्या भरात घरातुन निघाल्याचे सांगीतले व तिचे नाव अंजना परमेश्वर धनगर व मुलाचे नाव शिवम परमेश्वर धनगर असल्याचे सांगितले, ती बीड जिल्ह्यातील कसारी या गावची असल्याचे सांगीतले.तीला तालुक्याचे नाव सांगता येत नव्हते.महिला पोलिस कर्मचारी वर्षा थडवे यांनी अधिक चौकशी केली असता त्या महिलेने मुलास ताप येत असल्याचे सांगितले तेंव्हा त्यांनी मेडीकल वरुन तापीचे औषध आणून दिले.

    रात्रीची वेळ असल्याने ही महिला कुठे थांबणार हा प्रश्र्न निर्माण झाला.तेंव्हा वर्षा थडवे यांनी या महिलेला व तिच्या मुलाला स्वतःच्या स्कुटी गाडीवर बसवून उपजिल्हा रुग्णालयात नेले व तेथे ड्युटीवर असलेल्या परिचारिका यांना या महीलेची परिस्थिती सांगितली व रात्रभर या महिलेस थांबू देण्यास सांगितले.महीला पोलीस कर्मचारी वर्षा थडवे व सामाजिक कार्यकर्त्या सुर्यमाला मोतीपवळे यांनी या महीलेस अडचणी च्या काळात मदत केली.