पुरातून डोंगा चालवणाऱ्या विरांचं ना. वड्डेटीवार यांच्याकडून सत्कार व आर्थिक मदत

33

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.2सप्टेंबर):- वैनगंगा नदीच्या पात्रात असलेल्या बेळगावला , स्वतः जाऊन ना. विजय वड्डेटीवार (केंद्रीयमंत्री, पुनवर्सन मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी, पुरामुळे झालेल्या भयानक परिस्थिती चा आडावा घेतला.व पूर्ण परिस्थिती गावकऱ्यांकडून जाणून घेतली.

भयानक पुरामुळे परिस्थिती निर्माण झाली असताना सुध्दा , दोन डोंगे चालकांनी लोकांना व्यवस्थित ठिकाणी पोहचवण्याचा धाडस दाखवला. त्यांचा सत्कार ना. वड्डेटीवार यांनी शाल व नग्गद दोन हजार रुपये देऊन केला. सत्कार करण्यात आलेले श्री. गज्जनान चक्रू नांने (४५) रा. देऊळगाव त. ब्रम्हपुरी आणि कारू दिघोरे (६९) रा. डोनाळ त.लाखांदूर जिल्हा.भंडारा या दोन दोंगेकरूनी आपला जीव धोक्यात घालून पुरातून फसलेल्या लोकांना, देऊळगाव मध्ये सुरक्षित स्थळी पोहचवले.

         शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला की एक हेक्टर मागे अठरा हजार मिळणार व मोटर- पंप ची पण सुविधा करून मिळेल. व गावातील प्रत्येक पूरग्रस्तांना एका घराला दहा हजार मिळतील. असे ना. वड्डेटीवार साहेबांनी सांगून समोर च्या भविष्याला सुखरूप च्या शुभेच्या दिल्या.