कंपनीच्या अवैध वाहनाकड़े आर.टी .ओ . चे जनिवपूर्वक दुर्लक्ष

29

🔸एस. आर. के .कंपनीच्या वाहनावर करवाई करा-जनतेची मागणी

✒️मनोज गाठले(शेगाव-बु,प्रतिनिधी)मो:-9767883091

शेगाव(दि.16ऑक्टोबर):-शेगाव येथून जवळच असलेल्या भेड़ाळा येथे वरोरा – चिमूर नॅशनल हाइ-वे रोड़ चे काम करणारे एस . आर. के. कंट्रक्शन कंपनी चे मुख्य कार्यालय आहे. सदर या कंपनी कड़े असलेले सर्व वाहने तसेच मोठ – मोठ्या मशीन असून सदर या वाहनाची कसल्याही प्रकारचे कागद पत्रे , दस्तावेज नसल्याचे समजतआहे.

या वाहनावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ओरड जनता करित असून या गंभीर प्रश्नाकडे उपप्रदेशिक परिवहन विभाग चंद्रपुर यांचे जाणीव पूर्वक कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित विभागकडे जनता नाराजी व्यक्त करित असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे वरोरा – चिमूर नॅशनल हायवे रोड़ च्या बांधकाम करिता लागणारे सर्व वाहने या कंपनी कड़े नव नवीन उपलब्ध असून यात चार चाकी माल वाहतूक वाहने , हाइवा ट्रक , जेसीबी – पोकल्याणड मशीन , व सर्व वाहने असून या वाहनाची कुठल्याही प्रकारची कागद पत्रे , तसेच रोड़ टैक्स , तसेच विमा नसून सुद्धा या कम्पनिची सर्व वाहने भर दिवसा – रात्रो बेरात्री धावत असतात.

विशेष म्हणजे या वाहनाचे जर विमा इन्सुरेंस थाकित असेल तर यांच्या वाहनाने काही अपघात झाल्यास मृत किंवा अपंगत्व प्राप्त होणाऱ्या कुटुंबाला याचा कसलाही लाभ होणार नाही. त्यामुळे यांच्या वाहनवर कठोर करवाई होने गरजेचे आहे.
करिता या कंपनीच्या वाहनवर तसेच एस. आर. के . कंट्रक्शन कंपनी वर कठोर करवाई व्हावी व शासन तसेच संबंधित विभागाचे डोळे उघड़ावे या करिता प्रसारमाध्यमात अनेक वेळा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या परंतु यात काही संबंधित विभागाचे डोळे उघड़ले परंतु उपप्रदेशिक परिवहन विभाग चंद्रपुर याचेच डोळे बंद का ?

असा प्रश्न अनेकांना भेड़सवित आहे अखेर पाणी कुठे मूरत आहे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
इतकेच नव्हे तर यांच्या वाहनवर लाखो रुपये शासनाचे थकित असून यांची वाहने तत्काळ जप्त करण्यात यावे . माहिती च्या अधिकार अधिनियम ख़ाली या विभागला माहिती मागितली असता या संदर्भात कसलीही माहिती नसल्याची माहिती प्राप्त झाली परंतु गेल्या गेल्या तीन वर्षा पासून सदर या रोड़ चे काम संथगतीने सुरु आहे.

याची माहीती आर टी ओ विभाग उपप्रदेशिक परिवहन विभाग चंद्रपुर यांना याची काहीच भनक नाही यावर मात्र अनेकांची संशयाची सूई अडकली आहे . करिता या गंभीर प्रश्नांची सोडवणूक समन्धित विभाग करवाई करणार का? या कड़े सर्व जनतेचे लक्ष लागले आहेत .