भिम आर्मीने गृहमंत्री ना.अनील देशमुख यांच्या गाड्यांचा ताफा

56

🔹महिला अत्याचाराच्या विरोधात सादर केले निवेदन

✒️जळगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

जळगाव(दि.17ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना राज्यातील वाढत्या महिला अत्याच्याराच्या बाबतीत गाड्याचा ताफा भीम आर्मी ने अडवून निवेदन सादर केले.

यावेळी भीम आर्मी” महाराष्ट्र राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे व जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे,यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव मा.सुपडू संदानशिव , यावल तालुका अध्यक्ष मा.हेमराज तायडे मा.राहुल जयकर, अविनाश कोचुरे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यामध्ये जळगांव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावी घडलेल्या ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार संदर्भात तालुका यावल फैजपूर येथे महाराष्ट्र राज्य चे गृहमंत्री मा. अनिल जी देशमुख यांच्या ताफा अडवून चर्चा व निवेदन सादर केले* त्याचा निकाल लागतो न लागताच ५ दिवसात च रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून पीडितेसह तिच्या तिघे भावडांना त्या नीच नराधमानीं क्रूरतेची सीमा गाठत जीवे ठार केले.

बोरखेडा येथील घटनास्थळी भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख येत असल्याने त्यांचा ताफा अडवून राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या बाबतीत निवेदन सादर करण्यात आले.

प्रशासनाला करीत,,राज्याचे गृहमंत्री यांना “भीम आर्मी” महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मा.रमाकांत भाऊ तायडे यांनी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा दिला. अशी माहितीभीमटायगर-मा.प्रबुद्ध खरे (भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) यांनी दिली.