विकेल ते पिकेल ठाक्कर आडगाव येथे कार्यक्रम संपन्न

25

🔺बांधावर जाऊन पोखरा योजनेची शेतकर्याना मार्गदर्शन

✒️गोपाल भैया चौहान(विशेष प्रतिनिधी)मो:-9665667764

गेवराई(दि.27ऑक्टोबर):-तालुक्यातील ठाक्कर आडगाव येथे कैलास अनंदे या शेतकर्याच्या शेतात वीकेल ते पीकेल हा कार्यक्रम गेवराई कृषी विभागामार्फत शेतकर्याना मार्गदर्शन संपन्न झाले आहे

गेवराई तालुक्यातील ठाक्कर आडगाव येथील शेतकरी कैलास अनंदे यांनी पोखरा अंतर्गत दोन एकर शेता मध्ये दोन हजार पेरु तैवान पिं क फळबाग लागवड केली आहे सदरील शेतकर्याच्या बांधावर जाऊन कृषी साहय्यक सुहास शिंदे कृषी पर्यवेक्षक देशमुख साहेब व तलाठी निकाळजे व ग्रामसेवक कचवा साहेब यानी जनजागृती करुन माहीती दिली.

उपस्थित शेतकर्याना कार्यशाळेत विकेल ते पिकेल कार्यक्रम संपन्न झाला पोखरा अंतर्गत शेतकर्यानी शेतामध्ये फळ बाग लागवड ठिबक सिंचन शेततळे करुन समुह गट शेती करुन शेतकर्यानी प्रगती साधावी असे ही आवाहण कृषी साहय्यक सुहास शिंदे व पर्येवक्षक संदीप देशमुख यांनी केले शेतकरी कैलास अनंदे यांनी ही पेरू या फळ पिकाबद्दल माहिती दिली.या वेळी उपस्थित असलेले पत्रकार श्री गोपाल चव्हाण यांनी कृषी सहायक शिंदे सर व बाबु कोकाट यांचे अभिनंदन केले.

व त्यांच्या कामाची प्रशसा केली व तरी शेतकऱ्यांनी पोखरा योजनेतुन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले तरी परिसरातील शेतकर्यानी योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे यावेळी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी शेतात उपस्थित राहुन पाहाणी केली यावेळी समूह सहायक गणेश शिंदे वैभव भोले राजेंद्र महाराज अनंदे महाराज, श्री बाबु कोकाट,विलास कोकाट,जगन्नाथ कोकाट,गोरक्षनाथ कोकट,रामभाऊ उनवने,महादेव कोकाट आदी उपस्थित होते.