प्रलंबित वेतनासाठी एस.टी.कामगारांचा आक्रोश

31

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.27ऑक्टोबर):-कोरोना विषाणूच्या महामारीत एस.टी.कर्मचारी जीवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करीत आहेत . लॉक डाऊनच्या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार परराज्यातील मजूर यांना थेट त्यांच्या राज्यात सोडण्याची कामगिरी एस.टी.ने पार पाडली असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची वाहतूक तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एस.टी.कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत.

यामध्ये महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोनाबाधित झालेले असून सुमारे ७३ कर्मचारी मृत झालेले आहेत . अशा कर्मचा – यांपैकी बहुतांशी कर्मचा – यांच्या कुटूंबियांना अद्याप विमा कवचाची रू .५० लाखांची मदत प्रशासनाने दिलेली नाही . कोरोना कालावधीमध्ये कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही त्यांना माहे ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही . प्रशासनाने माहे जुलै २०२० या महिन्याचे वेतन दि .७ ऑक्टोबर २०२० रोजी देताना प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कपात केल्यामुळे एक महिन्याचे वेतनही अल्प प्रमाणात दिलेले आहे.

त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . शासनाच्या आदेशांचे पालन करून कोरोनाशी दोन हात करणा – या या कोरोना योद्यांना ज्यावेळी वेतन दिले जात नाही त्यावेळी त्यांनी आपला प्रपंच कसा चालवावा हाच मोठा प्रश्न कामगारांसमोर निर्माण झालेला आहे . यातच दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून एक कर्मचारी अजूनही सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत आहे.आपल्या कुटुंबातील सदस्याच्या आजारपणात उपचार करण्याससुद्धा आता त्यांचे गाठिला पैसा नसल्याचे एका एसटी कर्मचाऱ्याने रडवेल्या स्वरात सांगितले.

प्रशासनाने माहे जुलै २०२० चे वेतन ऑक्टोबर २०२० मध्ये दिले असले तरी माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२० चे वेतन कामगारांना अद्याप मिळालेले नाही . तसेच माहे ऑक्टोबर २०२० चे वेतनही लवकरच देय होणार आहे . याशिवाय शासकीय कर्मचा – यांप्रमाणे महागाई भत्ता व सण उचल देण्याची कामगार करारात तरतुद असतानाही सदर तरतुदीची रा.प.प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही . शासकीय कर्मचा – यांना वाढीव ५ टक्के महागाई भत्ता डिसेंबर २०१ ९ देय जानेवारी २०२० च्या वेतनापासून लागू केलेला आहे.

परंतु सदरचा वाढीव ५ टक्के महागाई भत्ता एस.टी.कामगारांना अद्याप लागू केलेला नाही . तरी सदरचा वाढीव ५ टक्के महागाई भत्ता माहे ऑक्टोबर २०२० च्या वेतनापासून लागू करण्यात यावा . तसेच महागाई भत्याची सन २०१८ मधील २ टक्क्याची तीन महिन्यांची थकबाकी , सन २०१ ९ मधील ३ टक्क्याची नऊ महिन्यांची थकबाकी व सन २०२० मधील ५ टक्क्याची १० महिन्यांची थकबाकीही कामगारांना अद्याप मिळालेली नाही . याबाबत संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे . मात्र प्रशासनाने सदरचा थकीत महागाई भत्ता रा.प.कामगारांना कामगार कराराच्या तरतुदीनुसार अद्याप दिलेला नाही . त्यामुळे कामगारांमध्ये याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

एस.टी.कर्मचा – यांना त्यांनी केलेल्या कामाचे नियत देय तारखेस वेतन देण्याची जबाबदारी कायद्याने एस.टी.प्रशासनाची असतानाही प्रशासनाकडून एस.टी.कामगारांना नियत देय तारखेस वेतन दिलेले नाही . सध्याच्या एस.टी.च्या बिकट आर्थिक परिस्थितीस कामगार जबाबदार नाहीत . कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे.

दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकीत वेतन , महागाई भत्याची थकबाकी व शासकीय कर्मचा – यांप्रमाणे सण उचल मिळावी या मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी सर्व पातळीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व एस.टी.कामगारांना वेतन मिळण्यासाठी दि .२ नोव्हेंबर २०२० रोजी मा.जिल्हाधिकारी व मा.तहसिलदार यांना निवेदन देतील . तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांनाही एस.टी.कामगारांना लवकरात लवकर वेतन मिळावे यासाठी निवेदन देतील . यानंतरही एस.टी.कामगारांना थकीत वेतन , देय झालेले वेतन , महागाई भत्याची थकबाकी तसेच शासकीय कर्मचा – यांप्रमाणे सण उचल एस.टी.कामगारांना न मिळाल्यास कर्मचारी आपल्या राहत्या घरासमोर आपल्या कुटूंबियांसह दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी वेतन मिळावे या मागणीसाठी आक्रोश व्यक्त करतील.

यानंतरही कामगारांना थकीत वेतन , थकीत महागाई भत्ता व शासकीय कर्मचा – यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कामगारांना प्रशासनाविरोधात तीव्र संघर्ष करावा लागेल .अशी माहिती कास्ट्रइब कर्मचारी संघटनेचेवतीने दिली असून प्रलंबित वेतन व वेटनेतर मागण्यासाठी सर्वच कामगार संघटना प्रयत्नशील आहेत.